प्रमाण भाषेचा आग्रह नको ...!!!
आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे , कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू लागला आहे , हे आधी मान्य करायला हवे.. हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देणे हे ब्राह्मणी मानले जाते. भाषा ही जात , आर्थिक स्तर , सांस्कृतिक पाश्र्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे , लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते.. भाषा हे संवादाचे माध्यम आहे ,यातून लोकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न कशासाठी ?? भाषिक दर्जा व वैचारिक दर्जा यांचा ओढून ताणून संबंध लावणे चुकीचे आहे. कारण भाषा प्रमाण वापरली आणि त्यातून विचार हीन मांडले तर काय उपयोग ? जसे कि जुन्या चित्रपट व मालिकांमध्ये दाखवले जाते कि समाजसुधारण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करणारे अगदी प्रमाण मराठीत बोलतात. तेव्हा हा काही निव्वळ योगा-योग नाहीय. प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे भाषेवर अन्याय करणे आहे . कारण भाषेचा उगम फार जुना आहे व त्यात कालानुरूप बदल झालेच आहेत. खरे तर आपल्याकडील लोक वैज्ञानिक असो व इतर क्षेत्रातील नवीन संज्ञा , शोधण्या पेक्षा त्याला मराठीत प्रति ...