Posts

Showing posts from April, 2017

प्रमाण भाषेचा आग्रह नको ...!!!

आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे ,  कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू  लागला आहे ,  हे आधी मान्य करायला हवे.. हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देणे हे ब्राह्मणी मानले जाते. भाषा ही जात ,  आर्थिक स्तर ,  सांस्कृतिक पाश्र्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे ,  लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण  असतेच असते.. भाषा हे संवादाचे माध्यम आहे ,यातून लोकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न कशासाठी ??  भाषिक दर्जा व वैचारिक दर्जा यांचा ओढून ताणून संबंध लावणे चुकीचे आहे. कारण भाषा प्रमाण वापरली आणि त्यातून विचार हीन मांडले तर काय उपयोग ? जसे कि जुन्या चित्रपट व मालिकांमध्ये दाखवले जाते कि समाजसुधारण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करणारे अगदी प्रमाण मराठीत बोलतात. तेव्हा हा काही निव्वळ योगा-योग नाहीय. प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे भाषेवर अन्याय करणे आहे . कारण भाषेचा उगम फार जुना आहे व त्यात कालानुरूप बदल झालेच आहेत. खरे तर आपल्याकडील लोक वैज्ञानिक असो व इतर क्षेत्रातील नवीन संज्ञा , शोधण्या पेक्षा त्याला मराठीत प्रति ...

कर्जमाफी आणि शेतकरी ...!!!

आज महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी चा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. नापिकी किंवा शेतमाला भाव नसणे या मुले शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढणे आवश्यक असले तरी सध्या कर्जमाफी देणे योग्य राहील. प्रत्येक देशाकडे स्वतःचा असा एक "X" फॅक्टर असतो कि ज्या बळावर तो विकास साधत असतो जसे कि अमेरिकेकडे तंत्रज्ञानाचे बॅकग्राऊंड आहे , सौदी अरेबिया कडे खनिज तेल आणि भारताची शेती ..!! भारताची आर्थिक पाहणीची आकडेवारी पहिली कि लक्षात येते कि ज्या-ज्या वर्षि देशाला मान्सून ने साथ दिली नाही त्या वर्षि देशात मंदीचे वातावरण राहिले. सरकार कडे एक रिपोर्ट सादर करण्यात आलाय  कि ज्या नुसार " सद्य स्थितीतील एकूण शेतकऱ्यांच्या १०% हुन कमी शेतकरी व लागवडी खालील एकूण शेतजमिनी पैकी १०-१२ % पैकी जरी जमीन कसली गेली तरी आपण देशाची अन्न-धान्याची गरज भागवू  शकतो म्हणे "  आता हा रिपोर्ट कोणी व कोणत्या आधारावर तयार केलाय व त्या मागचा नेमका हेतू काय हे जरी गुलदस्त्यात असले तरी तो देशहितास हानिकारक आहे हे नक्की ..!!  मागे अमेरिकेत आणि मग अर्थातच जगभरात आलेल्या...