प्रमाण भाषेचा आग्रह नको ...!!!
आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे, कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू लागला आहे, हे आधी मान्य करायला हवे..
हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देणे हे ब्राह्मणी मानले जाते. भाषा ही जात, आर्थिक स्तर, सांस्कृतिक पाश्र्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते..
भाषा हे संवादाचे माध्यम आहे ,यातून लोकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न कशासाठी ?? भाषिक दर्जा व वैचारिक दर्जा यांचा ओढून ताणून संबंध लावणे चुकीचे आहे. कारण भाषा प्रमाण वापरली आणि त्यातून विचार हीन मांडले तर काय उपयोग ? जसे कि जुन्या चित्रपट व मालिकांमध्ये दाखवले जाते कि समाजसुधारण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करणारे अगदी प्रमाण मराठीत बोलतात. तेव्हा हा काही निव्वळ योगा-योग नाहीय. प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे भाषेवर अन्याय करणे आहे . कारण भाषेचा उगम फार जुना आहे व त्यात कालानुरूप बदल झालेच आहेत.
खरे तर आपल्याकडील लोक वैज्ञानिक असो व इतर क्षेत्रातील नवीन संज्ञा , शोधण्या पेक्षा त्याला मराठीत प्रति शब्द शोधण्यात चा व्यग्र आहेत , मोठेपणा मनात आहेत. खरे तर " ठेविले अनंते तैसेचि रहावे " लोकच प्रमाण भाषा वापरू शकतात कारण नव-नवीन अनुभव घेणारे व त्यातून शिकणारे लोक स्वतःत बदल करणार हे निश्चित तेव्हा भाषा सुद्धा यापासून दूर राहू शकत नाही.
Comments
Post a Comment