कर्जमाफी आणि शेतकरी ...!!!
आज महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी चा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. नापिकी किंवा शेतमाला भाव नसणे या मुले शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढणे आवश्यक असले तरी सध्या कर्जमाफी देणे योग्य राहील. प्रत्येक देशाकडे स्वतःचा असा एक "X" फॅक्टर असतो कि ज्या बळावर तो विकास साधत असतो जसे कि अमेरिकेकडे तंत्रज्ञानाचे बॅकग्राऊंड आहे , सौदी अरेबिया कडे खनिज तेल आणि भारताची शेती ..!! भारताची आर्थिक पाहणीची आकडेवारी पहिली कि लक्षात येते कि ज्या-ज्या वर्षि देशाला मान्सून ने साथ दिली नाही त्या वर्षि देशात मंदीचे वातावरण राहिले. सरकार कडे एक रिपोर्ट सादर करण्यात आलाय कि ज्या नुसार " सद्य स्थितीतील एकूण शेतकऱ्यांच्या १०% हुन कमी शेतकरी व लागवडी खालील एकूण शेतजमिनी पैकी १०-१२ % पैकी जरी जमीन कसली गेली तरी आपण देशाची अन्न-धान्याची गरज भागवू शकतो म्हणे " आता हा रिपोर्ट कोणी व कोणत्या आधारावर तयार केलाय व त्या मागचा नेमका हेतू काय हे जरी गुलदस्त्यात असले तरी तो देशहितास हानिकारक आहे हे नक्की ..!!
मागे अमेरिकेत आणि मग अर्थातच जगभरात आलेल्या मंदीत भारत तगून राहिला याचे एकाच कारण होते ते म्हणजे देशातील शेतीवर आधारित अर्थव्यवस्था जी प्रचंड मोठी आहे त्यात देशातील ४०-५० % लोक गुंतलेले आहेत देशात मानवी श्रमांना व त्यातल्या त्यात शेती तील श्रमांना योग्य मोल भेटत नसल्याने देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत शेती आधारित उलाढालीचा टक्का कमी दिसतो मात्र तो दुर्लक्षित करण्यासारखा आजही नाही ..!!
तेव्हा देशातील "Policy makers " नी इतर देशातील आर्थिक विकासाचे मॉडेल अभ्यासण्यापेक्षा आपण ते कसे जगाला देऊ शकतो यावर विचार करावा ..!!
Comments
Post a Comment